या गॅझेटमध्ये एक एरर होती.

रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

तुझ्याविना सजणे

तुझ्याविना सजणे


व्यर्थ आहे जग हे सारे  तुझ्याविना सजणे ॥
अर्थ नाही जगण्यामध्ये तुझ्याविना सजणे ॥१॥


पूर्ण बघ झाले घर ते अपुल्या स्वप्नातले ॥
पर्णहीन गृहवट हा तुझ्याविना सजणे ॥२॥


सप्तसुरांच्या बांधणीतले गंधर्वांचे ऐकुन गाणे ॥
मंत्रमुग्ध मी नाही झालो तुझ्याविना सजणे ॥३॥ 


उंच आकाशी दूर मी गेलो तुला विसरण्यासाठी ॥
मन धरतीवर देह आकाशी तुझ्याविना सजणे ॥४॥


देवा चाले तुझ्याऐवजी एक सुपारी गाठी ॥
नाही पूजा करणार तयाची तुझ्याविना सजणे ॥५॥

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

ई-गीतसंग्रह

 ’फणसाचे गीतगरे’ हा माझा ई-गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. हा फ़्री गीतसंग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती
(चालीसाठी  येथे क्लिक करा )


गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥धॄ॥
कॄपासिंधू तू, तिमिर दूर कर, दीपपुंज पणती ।
अनाथ बंधू, भरभराट कर, आण सुफल भरती ॥
            लवूनी नमस्कार करिती
गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥१॥


दु:खनिवारक तू गजवदना, आण हास्य ओठी ।
सुखदायक तू मंगलमूर्ती, स्वर्ग आण धरती ॥
 लवूनी नमस्कार करिती
गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥२॥


कार्यारंभी पूजन करिती, लावून पणास भक्ती ।
मनगट बळकट करणारी ही, कामपूर्तीची शक्ती ॥
लवूनी नमस्कार करिती
गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥३॥