सोमवार, ६ ऑक्टोबर, २००८

टण टणा टण---- (Tan Tanaa Tan)

टण टणा टण, टण टणा टण
(या गाण्याच्या चालीसाठी य़ेथे क्लिक करा.)
टण टणा टण, टण टणा टण
टण टणा वाजे शाळेची घंटा ॥धृ॥
अभ्यासाची नही खंता
परिक्षेची संपली चिंता
डोक्यामधला सुटला गुंता ॥१॥
उन्हाळ्याच्या आल्या सुट्ट्या
आमरसाच्या भरल्या वाट्या
पापड करता खाऊ लाट्या ॥२॥
रोज सकाळी विटीदांडू
संध्याकाळी क्रिकेट चेंडू
थोडे खेळू थोडे भांडू ॥३॥
उन्हावेळी कॅरम गोट्या
खेळू आपण सागर गोट्या
चंदू, चिंगी आणि गोट्या ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: