या गॅझेटमध्ये एक एरर होती.

रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

शिवगॊरी नंदना, गणेशा,

शिवगॊरी नंदना, गणेशा,

शिवगॊरी नंदना, गणेशा,  करिते मी वंदना ॥धॄ॥

शिवपुत्राचा शंख निनादे, विघ्न शिघ्र हरदे ।
गणेश तांडव करी जग थोडे, षडरिपुंना पळतांना ॥
गणेशा, करिते मी वंदना
शिवगॊरी नंदना, गणेशा, करिते मी वंदना ॥१॥

मिस्किल हंसरा तरिही दरारा, असे तुझ्या लोचना ।
स्थुल कायेचा असुनी पसारा, स्फूर्तीमंत चेतना ॥
गणेशा, करिते मी वंदना
शिवगॊरी नंदना, गणेशा, करिते मी वंदना ॥२॥

बुद्धीचा अवतार असे तू, विद्देचा खजिना ।
सर्व कलांचा तू भवसागर, सर्जनशील कणा ॥
गणेशा, करिते मी वंदना
शिवगॊरी नंदना, गणेशा, करिते मी वंदना ॥३॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: